काळी मिरीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच उदाहरण घ्या. जर सर्दी झाली असेतर चहा मध्ये मिऱ्याची पावडर घालून पिल्यावर त्याचा नक्कीच फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे

  • हृदय रोगाचा धोका कमी होईल – कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित करण्याचा गुणधर्म काळ्या मिरीमध्ये आढळतो. हा गुणधर्म हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो. त्यामुळे हृदय रोगाची समस्या असणाऱ्यांनी अवश्य काळ्या मिरीचे सेवन करा.
  • गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका – काही लोकांना बऱ्याचदा पोटामध्ये गॅस निर्माण होणं अथवा अॅसिडिटीचा सतत त्रास होत असतो. तुम्हालादेखील असा त्रास असेल तर लिंबाच्या रसामध्ये काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घालून तुम्ही चिमूटभर खा. तुम्हाला या त्रासापासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
  • पचनशक्ती वाढवते – काळी मिरी टेस्ट बड्स उत्तेजित करते आणि पोटामध्ये हायड्रोक्लोरिक असिडचा स्रावदेखील वाढवते. त्यामुळे उत्कृष्ट आणि पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत मिळते. पचनाच्या सुधाराव्यतिरिक्त काळ्या मिरीमुळे पोटात सूज, पोट फुगणं, अपचन, पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठ या सगळ्या समस्यांपासूनही काळी मिरी सुटका मिळवून देते.
  • सर्दी खोकल्यावर उपयुक्त – सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो सेही सांगितले गेले आहे. म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. याचा परिणाम लवकरच दिसून तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून अवश्य आराम मिळेल. त्यामुळे आता पुन्हा कधी सर्दी खोकला झाल्यास आवर्जून काळ्या मिरीचा हा उपाय ट्राय करून पहा.
  • त्वचेचे आजार होतात दूर – काळ्या मिरीमुळे विटीलिगो अर्थात त्वचा रोग, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेसंबंधी अन्य समस्यादेखील दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –