दररोज दुध पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे…..

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते. तसेच गायीच्या दुधाचा खरा … Read more

माहित करून घ्या कारले लागवड माहिती

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. करल्यामध्ये नर (male) व मादी (female) फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात. कारले लागवडीसाठी मध्यम काळी, … Read more

उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – राजेश टोपे यांच्या सूचना

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडिटसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल. सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती … Read more

क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार – सुनील केदार

बुलडाणा – मागील कालावधीमध्ये कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू व क्रीडा क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र आता कोरोना कमी होत आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्राची नेत्रदीपक प्रगती आहे. या जिल्ह्यात क्रिडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक क्रिडा सुविधा, आधुनिक साहित्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून देणार. त्यामुळे जिल्ह्याचा … Read more

राज्यातील ‘या’ भागात ऐन दिवाळीत जोरदार पाऊस; ; मका, कापूस, तूरीचे मोठे नुकसान

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मका, कापूस, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, ऊस तसेच कडधान्ये, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोरसर … Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर – जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटना असून  या आगीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले. श्री. थोरात यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेतील … Read more

केजरीवाल सरकारची मोठी घोषणा – पंतप्रधान गरीब कल्याण मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ

नवी-दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.’ यासंदर्भात केजरीवाल म्हणाले की, ‘महागाई बरीच वाढली आहे आण … Read more

२० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे – सतेज पाटील

कोल्हापूर – येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू सभागृहात ‘पालकमंत्री कोविड लसीकरण’ प्रोत्साहन योजनेंतर्गत सामाजिक संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा … Read more

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

मुंबई – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार … Read more

जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक – अजित पवार

मुंबई – अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती … Read more