ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते.
प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.
मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर फायदेशीर आहे.
कॅलरी – कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे ६० ग्रॅम ताज्या खजुरातून १४२ कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
व्हिटॅमिन – ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी करण्यासाठी मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – गुलाबराव पाटील
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- शेतकऱ्यांना दिलासा देणार; कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – उसाच्या एफआरपीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा – अजित पवार