गुणकारी अंजीराचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

सुख्यामेव्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे अंजीर. अंजीर खाल्याने आपल्याला होणार्या बऱ्याच आजारांपासून आपले संरक्षण होते. अंजीराला सर्वश्रेष्ठ टाँनिक असे समजले जाते. अंजीर वाद, पित्त व कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी ठरते. अंजीरामध्ये अ जीवनसत्व, ब, क आढळतात.

यामुळे अंजीर आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते. रोज दोन ते चार अंजीर दुधात कुस्करून ते उकळून ते प्यावे. हे दुध पिल्याने शक्ती येते. शरीरात थकवा येत नाही.

आजकाल चिंता सगळ्यांच आहे. अतिशय चिंता करणे, सतत विचार करत राहणे याने आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर परिमाण होतो. त्वचा रुक्ष बनते, जीभ सुकते, तोंडात फोड येतात, अंग दुखते, थोडसं काम केलं तरी थकवा येतो, हातापायाच्या पोटऱ्या दुखायला लागतात असे बरेच परिणाम आपल्याला दिसू लागतात. अशा वेळी अंजीर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणा ऐवजी खावेत.

अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास जड असते. ते पित्त विकार आणि वात व कफ विकार दूर करते. अंजीर मधुर रसाचे विपाकातही मधुर, शीतवीर्य व सारक असते. ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा जास्त पौष्टीक असते. अंजीराच्या अनेक जाती आहेत.

महत्वाच्या बातम्या –