रब्बीसाठी ‘या’ धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता

सोलापूर – जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी (Rabbi) हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून 28 जानेवारी 2022 पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठक गुगल मीट ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान … Read more

राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय – एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्यात येणार आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा … Read more

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

चांगली बातमी – गोडतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

मुंबई : दिवाळ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना आणखी एक सुखद बातमी मिळाली आहे, आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ गोडतेलही ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत इंधनदरात दिवसेंदिवस वाढ सुरुच होती. दिवाळीपूर्वी दिड महिन्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात पंधरा वेळा वाढ करण्यात आली होती. जगातील खाद्यतेल … Read more

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल – बाळासाहेब थोरात

अमरावती – कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमाविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह आपण एकटे नाहीत या भावनेमुळे धीर देणारा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. महिला आर्थिक विकास महामंडळ, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, सह्याद्री फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात … Read more

प्रकल्पग्रस्तांचे एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका – बच्चू कडू

अमरावती – विभागातील विविध सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व त्यांच्या तक्रारींचे समन्वयाने निराकरण करून त्यांचा एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे सुस्पष्ट आदेश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले. … Read more

संत्री लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० … Read more

खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..

खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. … Read more

‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या

अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे प्रमाण अधिक वाढलेलं पाहायला मिळातं. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. परंतु काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. पाल दिसल्यास तिच्यावर बर्फाचं पाणी स्प्रे करा. ज्या ज्या वेळी पाल दिसेल त्या … Read more

झेंडू लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला … Read more