स्वयंपाकघर…किचन.. प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स.
- कच्ची केळी ,फणस, सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही.
- फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील.
- फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल, तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे दुर्गंध निघून जाईल.
- तांदुळ आणि गव्हाच्या पोत्यात चुन्याचा चुरा कपड्यात बांधून ठेवावा, त्याने कीड नाही लागत. आणि कोरडेपणा राहतो.चुन्याऐवजी लाल मिरच्याही ठेवता येतील.
- धान्य किंवा डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांमध्ये कडुनिंबाचा पाला सुकवून ठेवावा. त्यामुळे तिथे कीड लागत नाही.
महत्वाच्या बातम्या –