दिलासा! देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवी-दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असे असतांनाच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandviya) यांनी देशवासियांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.

सोमवार(२९ नोव्हें.)पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलत असतांना मांडविया म्हणाले की,’कोरोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधनं, प्रयोगशाळा आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करु शकतो. दरम्यान आजच्या घडीला देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. तसंच हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे.’

दरम्यान, अफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे.

महत्वाच्या बातम्या –