आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.

वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा

उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो. आवळा..बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. या फळात अनेक गुणधर्म आहेत. आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता त्याकडे औषध म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म तुम्हला अनेक आजारापासून दूर ठेवतात. छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एबी कॉम्पेक्स, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक सत्व असतात. आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते.

व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे घरघुती उपाय

चला तर मग जाणून घेऊयात आवळा सरबत पिल्याने कुठले आजार टाळता येतात…… 

  • आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.
  • रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे.
  • आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.
  • आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

  • आवळा हा पाचक आहे. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित राहते.
  • आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.
  • लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.  सरबत प्यायल्याने लघवीसंबंधीचे आजार दूर होतात.
  • ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. मुतखड्याचा आजार दूर होण्यास मदत होते.
  • आवळ्यामुळे मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या आवळ्याच्या मुरंब्याचे फायदे…

Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे