अंजीर फळ खाणं आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक, जाणून घ्या फायदे

अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक आहे. पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.  चला तर जाणून घेऊयात अंजिराचे काही रहस्यमय फायदे.

  • हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते.
  • अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास जड असते. ते पित्त विकार आणि वात व कफ विकार दूर करते.
  • जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.
  • अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.
  • अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

महत्वाच्या बातम्या –