Share

माहित करून घ्या कारले लागवड माहिती

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. करल्यामध्ये नर (male) व मादी (female) फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात.

कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. ताटी पद्धतीने लागवड करण्यासाठी 1.5 x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या जातींची निवड करावी. लागवडीसाठी प्रतिहेक्‍टरी दोन किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. पिकावर केवडा, भुरी हे रोग येतात. तसेच फळमाशी, सूत्रकृमीचा प्रादुर्भाव दिसतो.

महत्वाच्या बातम्या –  

पिक लागवड पद्धत मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon