केजरीवाल सरकारची मोठी घोषणा – पंतप्रधान गरीब कल्याण मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ

नवी-दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.’

यासंदर्भात केजरीवाल म्हणाले की, ‘महागाई बरीच वाढली आहे आण करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक लोक बेरोजगार झाले आहे आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की गरिबांसाठी मोफत रेशन देण्याच्या या योजनेला सहा महिने वाढविण्यात यावे.’

दरम्यान, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी करण्यात आली होती. सुरूवातीस ही योजना तीन महिन्यांसाठी होती. त्यानंतर या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला. सध्या देशभरात ८० कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –