दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते.
तसेच गायीच्या दुधाचा खरा उपयोग कावीळ, जलोदर, यकृत व पांथरीची वाढ या विकारात होतो. पाणी पिण्यावर व आहारावर नियंत्रण असते या विकारात केवळ गोदुग्ध आहारावर राहून रोगी बरे होतात. एक-दीड लिटपर्यंत गायीचे दूध रोज प्यावे.
याचप्रमाणे दूध हे त्वचेस कोमल बनवते. सोबतच मुलायम आणि चमकदार हि बनवते. दुधात त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे पण असतात. याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला एका बाथटब मध्ये दूध भरायचे आहे आणि त्यात बसून आराम करायचा आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला दिवसातून कमीत कमी दोन ग्लास दुध सेवन करणे जरुरी आहे.
दरम्यान, दुधात सापडणारे सर्व विटामिन्स आणि खनिजे आपल्यासाठी चिंता हारक ठरतात त्यामुळे त्याचे आभार मानले पाहिजे. दिवसभर काम केल्यावर जर एक ग्लास दूध पिल्यास स्नायू आणि मस्तकातील सर्व वेदना व काळजी कमी होण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २ दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अंदाज
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा – पंतप्रधान गरीब कल्याण मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- मोठी बातमी – ‘या’ तारखेपासून बंद होणार पंतप्रधान गरीब कल्याण योजना
- सावधान! राज्यात पुढील २ ते ३ दिवस पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
- चांगली बातमी – गोडतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त