मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात आनंदात जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठा दिलासा: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
- पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरकुल – नितीन राऊत यांची घोषणा
- पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याचा लवकरच निर्णय घेण्यात येणार – वर्षा गायकवाड
- शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती
- कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे