डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा.

दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या आहेत याची नोंद ठेवणे. सकाळचा नाश्ता आवर्जून करणे. सकाळच्या नाश्त्यावर विशेष भर हवा. एकाच वेळी जेवण न करता, दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने नेमकेच जेवण करणे. सायंकाळी 7 नंतर काही खाणं टाळायला हवं. म्हणजेच सायंकाळी 7 च्या आधीच जेवण करावं. त्याने पचन चांगलं होतं.

नित्यक्रमाचं काटेकोरपणे पालन करणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ न देणे. शरीराला पुरेसा आराम मिळणे गरजेचं आहे. त्यामुळे फिट असणारे लोक आवश्यक झोप घेतात. झोपण्याअगोदर दुसऱ्या दिवसाचं नियोजन, कामांची यादी तयार करावी. त्यामुळे कामांत अडथळा न येता ती सुरळीत पार पडतात.

महत्वाच्या बातम्या –