बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे. बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो. बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो. बीटाची कोशिंबीर करतात. बीटामधे साखर असते. चला तर जाणून घ्या लागवड…
‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे
बीट थंड हवेत चांगले येत असल्यामुळे आपल्याकडे त्याची लागवड रब्बी हंगामात करतात. युरोप-अमेरिकेत पेरणी वसंत ऋतूत करतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पीक तयार होते. लागवड गादीवाफ्यात बी पेरून करतात. त्यासाठी दोन झाडांमधील अंतर 20 ते 30 सें.मी. ठेवतात.
आवश्यकतेप्रमाणे उगवलेल्या रोपांची विरळणी करून योग्य ते अंतर ठेवले जाते. बीटसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते, फक्त मुळांच्या भरदार वाढीसाठी ती पुरेशी भुसभुशीत असावी लागते. वाढीच्या काळात अनेक वेळा पाणी द्यावे लागते. भरपूर पाणी आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळण्यावर कंद मोठे होणे अवलंबून असते. कंद व्यवस्थितपणे उकरून काढतात आणि धुऊन, वाळवून विक्रीसाठी पाठवतात.
आता फक्त १ रुपयात मिळणार २ लाख रुपयांचा विमा
बीटच्या दोन प्रमुख जाती आहेत- पांढरे आणि तांबडे बीट. तांबडे बीट भाजी, कोशिंबीर, सॅलड आणि चटणी करण्यासाठी वापरतात. पांढरे बीट म्हणजेच शुगर बीट. त्याची साखर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. अठराव्या शतकापर्यंत साखर मुख्यत: उसापासून करीत असत.
काही प्रमाणात शिंदीच्या झाडापासून गुळी साखर किंवा खांडसारी साखरही केली जात असे. 18व्या शतकात साखरटंचाईला तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युरोपातील हवामानात ऊस पिकत नसल्यामुळे तेथील पर्यावरणात वाढणारे, त्या काळापर्यंत फक्त भाजी व सॅलड म्हणून वापरण्यात येणारे पांढरे बीट प्रयोगासाठी निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –