फक्त केळीच नाही तर केळीच्या सालही शरीरासाठी पोषक ठरते? जाणून घ्या कसं…….

केळ हे सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. तसेच केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या तुलनेत फार जास्त असतात. यात सेरोटोनिन, टॅनिन, डोपामाइन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, नॉर-एपिनेफ्रिन आणि हायड्रोऑक्सिप्टामाइन इत्यादी पोषक तत्व असतात.

केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी कमी करता येते. आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला केळातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर केळीचे साल खाणे सुधा तितकेच महत्वाचे आहे. केळीच्या सालीमध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणत आपल्याला आढळते. ऑस्ट्रेलियातील आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार केळीच्या सालीचे सेवन केल्याने विटामिन बी6 शरीरास मिळते.

चला तर मग जाणून घेऊयात काय फायदे आहेत केळीच्या सालीमध्ये……..

  • केळीच्या सालीचे रोज एकदा सेवन केल्याने महिन्याभरात सुमारे २ ते ३ किलो इतके वजन घटण्यास मदत होते. आणि तेही कोणतेही कष्ट न घेता. सॉल्युबल आणि इनसॉल्युबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीमध्ये आढळते. ज्याचा शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  • जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.
  • सोरायसिस झाल्यावर केळीची साल बारिक करून त्या ठिकाणी लावा.असे केल्याने डाग दूर होतात आणि आराम मिळतो.
  • केळीची साल हळुवार चेहेऱ्यावर चोळल्यास चेहेऱ्यावरील मुरुमं व पुटकुळ्या नाहीश्या होण्यास मदत होते. तसेच केळीच्या सालीने चेहेऱ्यावर हळुवार मसाज केल्याने चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
  • जे आपण केळीची साल आतल्या बाजून स्किनवर घासल्यास सुरकुत्या लवकर पडत नाहीत.
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठीही केळीच्या मूळांचा वापर करू शकता. कारण केळीच्या मुळांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे केळीच्या मुळाचं सेवन करून शरीराची व्हिटॅमिन ए ची गरज पूर्ण केली जाऊ शकते. याने डोळ्यांना आणि शरीराला फायदा होतो.
  • जर एखाद्या लहान किड्याने चावले असल्यास तिथे काही मिनिटे केळ्याची साल ठेवावी, जळजळ बंद होते.

महत्वाच्या बातम्या –

बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक

हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..

हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……

जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?