नवी दिल्ली- गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जाहीर पत्र लिहून अभिनंदन केले आहे. येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबतची संसदीय प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय आहे. गोठवणारी थंडी, कडक ऊन, पाऊस अशा संकटाना गेले वर्षभर तुम्ही तोंड देत तिन्ही शेतीविरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी तुम्ही जो सत्याग्रह जिंकलात, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासात सापडत नाही. या लढ्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
पुढे संघर्ष अजून संपला नसल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले. शेतमाला हमीभाव, वादग्रस्त वीज कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करणे, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरील कराचा बोझा कमी करणे, डिझेलच्या किंमतीमधील अप्रत्यक्ष दर वाढ कमी करा, शेतमजूरांवरील कर्जाचे ओझे कमी करणे आदी मुद्दे आहे. शेतकऱ्यांना आपला नफा-तोटा चांगल्याप्रकारे समजतो. काही मूठभर भांडवलदारांचे बाहुले बनून शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतीत गुलाम करण्याचा कट रचण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज
- जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- सर्वसामान्य शेतकऱ्यांची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला खोचक टोला
- प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा – छगन भुजबळ
- जाणून घ्या , ‘मेथी’ खाण्याचे हे आहेत फायदे…..