‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – शंभुराज देसाई

मुंबई – पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना … Read more

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – अजित पवार यांचे निर्देश

मुंबई – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद … Read more

विदर्भातील बेरोजगारांना कल्पना सरोज यांची कंपनी रोजगारासोबतच प्रगतीचे पंख देईल – नितीन राऊत

नागूपर –  टेलरींग काम ते कोट्यवधीच्या उद्योगाचे यशस्वी वहन करणाऱ्या डॉ. कल्पना सरोज यांना बेरोजगारीचे चटके माहित आहे. त्यामुळे विमान इंजन दुरुस्तीच्या त्यांच्या कोट्यवधीच्या प्रकल्पातून विदर्भातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळेल. सोबतच प्रतिकूल परिस्थितीत उद्योग, व्यवसायात कसे उभे राहायचे याची प्रेरणाही मिळेल, त्यामुळे कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रा. लि. प्रकल्पाचे भुमीपूजन करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन … Read more

जलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प

पुणे : जांब (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावाने एकत्रित काम करून जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला असून पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील 500 एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे. गावच्या सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र ‘ संस्थेने … Read more