दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार – वर्षा गायकवाड

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे

पुणे – जागतिक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा-2020 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. … Read more

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

मुंबई – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील  दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील दहावीपुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली ही रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी ४३६ कोटी … Read more

कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा – दत्तात्रय भरणे

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर … Read more

जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत – अजित पवार

पुणे – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार अशोक पवार, माजी … Read more