राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आगोदरच मदत मिळणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून दहा हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी मंत्रीमंडळाने अत्ताच मान्य केली ती दिवाळीनंतर मिळेल. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. एकूण दोन टप्प्यात मदत मिळणार असल्याचे संकेतही यावेळी राजेश टोपेंनी दिले आहे.

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून दहा हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात राज्यात पुरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ही मदत जाहीर करण्यात आल्याचे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, तसेच ही मदत २ हेक्टर मर्यादेत देणार आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला आहे. ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे या मदतीस पात्र ठरणार आहेत. हा निधी तत्काळ वाटप करण्याच्या हालचाली सध्या प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला आहे. ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे या मदतीस पात्र ठरणार आहेत. हा निधी तत्काळ वाटप करण्याच्या हालचाली सध्या प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या –