मुंबई – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी
- हवामान विभागाचा मोठा अंदाज; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावासाची शक्यता