नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं सरकार सेवा भावनेतून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. अनेक पिढ्या जे स्वप्न पाहत होत्या ती स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.
या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत पंतप्रधान मोदीनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे.
'झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए'
तीनों कृषि कायदे वापस लिए गए,
हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
केंद्र सरकारने केलेल्या या घोषणेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकयांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए. तिन्ही कृषी कायदे रद्द केले गेले, आपल्या देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी मोदींना झुकायला लावलं. देशातील शेतकऱ्यांना माझा सलाम आणि शहिद शेतकऱ्यांना माझं अभिवादन, असं म्हणत नवाब मलिकांनी केंद्रावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी
- हवामान विभागाचा मोठा अंदाज; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावासाची शक्यता