शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहेअशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी  दिली.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीस विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरियाआ.विप्लव बाजोरियाआ.अमोल मिटकरीविधानसभा सदस्य आ. नितीन देशमुखजिल्हाधिकारी निमा अरोराजिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवारविभागीय कृषी सह संचालक तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोतजिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे तसेच सर्व उपविभागीय कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी नियोजन सुरु असून जिल्ह्यात आवश्यक तितका बियाणे साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख  २६ हजार ३८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात एकूण ७३ हजार १७४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आवश्यक खतांचा साठाही असून मंजूर आवंटन ४४ हजार ६६० मे. टन आहे.

यावेळी ना.भुसे म्हणाले कीराज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी महाबीज येथे सुद्धा आढावा घेण्यात आला. नगदी पिकेधान्य पिकेफळ पिके यासोबतच भाजीपाला पिकांची बियाण्यांबाबत राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाच्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे. स्वर्गीय गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आढावा घेतांना ना.भुसे यांनी वरील निर्देश दिले. शासनाच्या बियाणे अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करावी व गहूहरभरा पिकांची बियाणे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उपलब्ध करून द्यावीत,असेही त्यांनी निर्देश दिले. पीक विमा योजनेत विमा कंपनीने नामंजूर केलेल्या प्रत्येक प्रकरणाचा आढावा घ्यावात्यातील त्रुट्या दूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. पीक कापणी प्रयोग सुद्धा गांभीर्याने करावेकापणी प्रयोग करतांना पिकातील कचराखराब मालओलसरपणा इ. बाबी वजावट कराव्या. ज्या शेतकरी कुटुंबातील कर्ती व्यक्ती कोरोनामुळे मयत झाली असेल अशा कुटुंबाला भेट देऊन त्यांना योजनांचा लाभ देऊन  मदत देण्यात यावी. कृषी पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याने स्थानिक कल्पना राबवून चालना द्यावी.

ना.भुसे यांनी संगीतले कीअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ नुकसान भरपाई २५ टक्के देण्याबाबत सहमती झाली असून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल,याचे नियोजन विमा कंपनीने करावेअसे निर्देश त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –