केस का गळतात? जाणून घ्या कारणे

केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले.

केस गळतीची कारणे :-

जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते.

हार्मोन्समध्ये बदल होणे- पॉलिसिस्टिक ओवेरी सिंड्रोम, गरोदरपण, मेनोपॉज या काळात हार्मोन्समध्ये बदल होत असतो.

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसांची वाढ थांबते. त्यामुळे याचा परिणाम केसांवर होऊन केस गळू लागतात.

शरीरात झिंक, बायोटिन, प्रोटीन ही पोषकतत्व कमी असल्यास केसांची मुळे कमजोर होऊन केसांची गळती होऊ लागते.

महत्वाच्या बातम्या –