नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते.
गुणकारी तीळ
संक्रांत ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू! थंड बोचरा वारा या ऋतूत जाणवत असल्याने थंडी कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ योग्यत्या प्रमाणात वापरावेत. या कालखंडामध्ये शरीराचे बल उत्तम असते. अशा परिस्थितीत तिळगूळ, साजूक तूप गुळाची पोळी हे पदार्थ पथ्यकरच ठरतात.
- आपण स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो. औषधामध्ये मात्र काळे तीळ वापरावेत.
- रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात.
- सांधेदुखीसाठी तिळाचेतेल गरम करावे आणि या गरम तेलाने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालिश) करून शेकावे. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते.
- मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.
- लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.
गुळाचा उपयोग
तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. गूळ अतिशय आरोग्यदायी असल्याने स्वयंपाकात तर तो वापरला गेलाच पाहिजे. भरपूर श्रम केल्यानंतर खूप थकवा येतो.
- शिवाय कफ, सर्दी झाल्यास अशा वेळी सुंठ, गूळ आणि तूप यांचे चाटण किंवा गोळी रोज खाल्ल्यास चांगला फायदा होतो.
- आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो.
- तसेच साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केला, तर उष्ण पडत नाही. म्हणूनच तर संक्रातीला गुळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे.
महत्वाच्या बातम्या –