चिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

फळे खाल्ल्याने ताकद येते. फळांमध्ये आरोग्याला आवश्यक असणारे अनेक घटक असतात असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, विशिष्ट फळात नेमके कोणते गुणधर्म असतात, हे माहित असणेही तितकेच आवश्यक आहे. चिकू हे बऱ्याचदा बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि भारतीयांना आवडणारे फळ. गोड चवीच्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.चिकूमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असल्याने उर्जा मिळण्यास अतिशय उपयुक्त असते. चला तर ,ग जाणून घेऊ फायदे…..

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

  • हाडे मजबूत होण्यास चिकूतील घटक उपयुक्त असतात. कॅल्शियमबरोबरच चिकूमध्ये फॉस्फरस आणि लोह यांसारखी आरोग्याला आवश्यक असणारी महत्त्वाची खनिजेही असतात. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी चिकू एक उत्तम फळ आहे.
  • रोजच तुमची जास्त चिडचिड होत असेल तर चिकू खाल्याने मन शांत ठेवण्यासाठी चिकू खा तुम्हाला फरक जाणवेल.

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

  • चिकू खाणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ए आहे, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला असते. चिकू खाल्याने आपल्या म्हातारपणात डोळ्यांची समस्या तितकी जास्त प्रमाणात जाणवनार नाही.
  • अन्न पचनाची समस्या असल्यास चिकुचे सेवन करा त्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करते. चिकू खाल्याने त्वचेची चमक कायम राखण्यास मदत मिळेल. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई असते जे आपल्या त्वचेला ओलावा देते आणि आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते. म्हणून चिकू खाणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
  • चिकूमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात.

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय