कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली:  आज सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. ही बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आज मोदी महत्वाची चर्चा करणार आहेत. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारताला महत्वाचे पाऊल उचलण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवरच आज नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत.

नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये यूरोप आणि आफ्रिकेत निर्माण झालेल्या स्थितीनंतर भारतानं कोणती काळजी घ्यावी. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांबद्दल कोणते निर्णय घेण्यात यावेत या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये राज्यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –