मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. १२ जानेवारी २०२२

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने (Cabinet) मान्यता दिली. मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या … Read more

‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत … Read more

राज्यातील चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई – धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. श्री. मदान यांनी सांगितले, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १० नोव्हेंबर २०२१

मुंबई –  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 … Read more

महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या

मुंबई – विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी  दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी … Read more

महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी सानुग्रह अनुदान जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली – २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत (दिनांक २९ ऑक्टोबर २०२१) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत रुपये २० हजार … Read more

मोठा निर्णय : महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 … Read more