घसा दुखतोय तर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घेतले जातात पण काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरू होतो. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासातून कायमची सुटका करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय…..

  • पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
  • लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.
  • घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा.त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.किंवा आल्याचे चार तुकडे,दोन टोमॅटो,मध यांचा रस करुन प्या.
  • मधात काही लवंगा टाका.काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा.लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
  • पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.

महत्वाच्या बातम्या –