मुंबई – कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही.
मात्र, ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.
कोकमचे फळ हे गोवा आणि गुजरात येथे सर्वाधिक आढळते. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते. या फळांची साले सुकवून टेवली जातात. कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. कोकम चिंचेप्रमाणे आंबट असते.
कोकम सरबत बनवण्याची कृती
कोकम ५ ते १०, ५० ग्रॅम साखर, काळे मीठ, जिरे पावडर, कोकम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कोकमचे पाणी चांगले एकजीव करून घ्या. यात साखर, काळे मीठ आणि जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करा.
महत्वाच्या बातम्या –