काड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे.
थंड पदार्थ : सफरचंद, चिकू, कांदा, पालक, कोबी, गाजर, बीट, बडीशेप, वेलची, डाळींब, मूग डाळ आणि दूध, दही, तूप, ताक, तांदूळ
उष्ण पदार्थ: संत्री, लिंबू, बटाटा, टॉमेटो, कारले, मिरची, मका, मेथी, वांगे, भेंडी, पपई, अननस, ऊस, मीठ, चणाडाळ, गुळ, तिळ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर, हळद, कॉफी.
उन्हात नेमकं काय खावे?
फळे: उन्हाळ्यात द्राक्षे, खरबूज, टरबूज, आंबा ही फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रसदार फळांचे सेवन गरजेचे ठरते.
भाज्या: भाज्यांमध्ये पांढरे कांदे, पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, भाज्यांचा ज्यूस, आवळा, कोबी, मशरूम, भेंडी, पडवळ, बीट, रताळी, गाजर, तांदुळजा, सुरण इत्यादी प्रकार असावेत. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे रायते, फळांचे शेक्स, सूप्स, नाचणीचे आंबिल, दही-भात असे प्रकार घ्यावेत.
मसाले: मसाले निवडताना शक्यतो धने आणि जिरे वापरावे. इतर उष्ण प्रकारचे मसाले वापरू नयेत. हर्बल टी किंवा ग्रीन टी शरीरासाठी चांगला असतो.
दही-ताक: ताजे दही किंवा ताक उन्हाळ्यात अवश्य घ्यावे. पचन चांगले होते, शरीराला थंडावा मिळतो. पुदिना, ताक मसाला घालून चविष्ट असे पाचक बनविता येते. उन्हात जाण्यापूर्वी ताक पिऊन बाहेर पडावे. घरच्या दह्याचा चक्का करून त्याचे पौष्टिक मयोनिज करावे आणि ते भाज्या व फळांसोबत खावे. त्याशिवाय चमचाभर तुळशीचे बी किंवा सब्जा पाण्यात भिजत घालून थंड दुधातून घ्यावे. मुलांना देताना थोडा गुलकंद, वेलची किंवा इसेन्स घालून द्यावे.
उन्हाळ्यात काय करावे?
- घरी बनविलेले ताज्या फळांचे ज्यूस, आइस्क्रीम्स, कुल्फी खावी. ताजा उसाचा रस मात्र बर्फ न घालता घ्यावा.
- हलके, पौष्टिक, कमी स्निग्धांश असलेले अन्न खावे. दिवसातून चार वेळा थोडे थोडे अन्न खावे.
- मिठाचा वापर योग्य प्रमाणात करावा.
- सकाळचा नाश्ता नियमित घ्यावा व रात्री लवकर जेवावे.
- जेवण टाळू नये. शक्यतो उपास टाळावा.
- जेवणाआधी पाणी पिऊ नये.
उन्हाळ्यात काय टाळावे?
- कॅफीनेटेड, कार्बोनेटेड, अल्कोहोलिक पेय कमी प्यावे. या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग व भरपूर साखर असते. त्यामुळे भूक मरते. काही वेळा डायल्युटेड फॉस्फरिक ऍसिडही आढळते, ज्याचा पचन संस्थेवर दुष्पपरिणाम होतो; तसेच किडनी स्टोन, दातांवर प्लाक तयार होणे असे आजार जडू शकतात. दातांच्या घनतेवरही परिणाम होऊ शकतो.
- बाहेर मिळणारे गाडीवरचे गोळे, कुल्फी, पेप्सीकोला खाऊ नये.
- गार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाऊ नयेत.
- समोसा, कचोरी, फरसाण, बुंदी, चिप्स, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
- थंड ज्यूसेस किंवा सरबते घेतल्यावर आल्हाददायक वाटते खरे; पण ते सरबत बनविण्याची पद्धत, त्याची पौष्टिकता यांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे सरबत घेण्यापूर्वी या काही गोष्टींचा विचार करा. शक्यतो घरच्या घरीच सरबते तयार करून ठेवा. ज्यूस काढल्यानंतर तो तसाच ठेवला, तर काढण्याच्या व ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये अ जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो; तसेच जीवनसत्त्व के टी हेसुद्धा कमी होते. त्यामुळे
- फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाव्या. ज्यूसर किंवा मिक्सरसुद्धा धुवावा.
- ज्यूस हवेच्या कमीतकमी संपर्कात ठेवावे. तयार ज्यूस लगेचच प्यावे. ज्यूस घोट घोट घेतला, म्हणजे त्यात लाळ मिसळून रसातील साखर पचण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –