लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे. लिंबाची चव आंबट-गोड, कडवट असते. लिंबू पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात विकण्यास येतात. पण हे प्रत्येक ऋतूत दिसतात. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते.
लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती –
- लिंबाचा रस – पोट दुखत असेल तर लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. त्यामुळे पोटदुखी थांबते.
- लिंबाच्या साली – लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या अॅँटी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.
लिंबाचे फायदे –
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर मध व लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
- नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
- वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.
- व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे होणारा स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो.
- पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास पचनसंस्था सुधारते व भुक वाढते
- शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते.
महत्वाच्या बातम्या –