अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करावेत, एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही – छगन भुजबळ

नाशिक – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे … Read more

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित प्रत्यक्ष पंचनामे करा – सुनील केदार

नागूपर – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत त्वरित प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिले. त्याबाबत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात येईल, असे सांगितले. कळमेश्वर तालुक्यातील उबाळी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषक भारती को-ऑपरेटीव्ह कंपनी व खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या … Read more

बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त  मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर  तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून श्री. … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर

नवी-दिल्ली – अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत लवकरात-लवकर बाधीतांपर्यंत पोहोचेल याची … Read more

शासकीय कापूस खरेदी दहा दिवसापासून बंद

कापूस पणन महासंघातर्फे राज्यांमध्ये शासकीय हमीभाव केंद्राद्वारे कपाशीची खरेदी सुरू होती. पण, मागच्या दहा दिवसांपासून ही खरेदी पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. भाव पाडून कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आळीचा प्रादुर्भाव राहिल्याने शेतकऱ्यांना उभा कापूस आपल्या शेतातून काढून टाकावं लागला. यातून … Read more

नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कांद्याची टाकलेली रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. त्यामुळे अनेकांना परत कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. रोपे जानेवारीच्या सुरुवातीला उपलब्ध होऊ लागल्याने कांदा लागवडींना वेग आला आहे. चालू वर्षी मिळालेला विक्रमी दर, मुबलक पाणीसाठा ठा यामुळे चालू वर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती आहे. विदर्भात थंडीची लाट मात्र, सुरुवातीला अनेक कांदा … Read more

अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट

अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत असताना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांवर अवकाळीचे संकट आले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक, येवला, सिन्नर तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात जरी पाऊस झाला … Read more