पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना – यशोमती ठाकूर

अमरावती – चांदूर रेल्वे तालुक्यातील मोथा-बासलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले. वन विभागातर्फे बासलापूरच्या जंगलात निर्माण करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. … Read more

‘हनी मिशन’ योजनेतून स्वयंरोजगाराची संधी

अमरावती – जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ग्रामीण भागात पूरक रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. याचअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील योगिता इंगळे या युवतीने ‘गॉर्जेस रॉ हनी’  या नावाने मधाचा ब्रँड विकसित केला असून, त्यातून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून या युवतीची निवड करण्यात आली … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध

अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात  17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे  नियोजन … Read more

देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – नरेंद्र मोदी

अमरावती – कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. … Read more