प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जोपासणे आवश्यक – बच्चूभाऊ कडू

अमरावती – खेळात हारजीत होतच असते. पण निराश न होता खेळत राहिले पाहिजे. खिलाडू (Players) वृत्ती कायम ठेवली पाहिजे,  असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले. रुरल इन्स्टिट्यूट येथे मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीसवितरण करताना ते बोलत होते. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, संस्थेचे अध्यक्ष गुड्डू ढोरे, संदीप देशमुख, क्रीडा प्रशिक्षक रोनी बिंदल, हेमंत देशमुख, … Read more

पुनर्वसन प्रक्रियेत नागरी सुविधा निर्मितीची कामे नियोजनबद्ध पध्दतीने व गतीने पूर्ण करावी – बच्चू कडू

अमरावती – जिल्ह्यातील चंद्रभागा बॅरेज प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुनर्वसन (Rehabilitation) प्रक्रियेची कार्यवाही  करतांना  मूलभूत नागरी सुविधा तातडीने निर्माण करण्यात याव्या. या परिसरात पुनर्वसन (Rehabilitation) करण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी येत्या जानेवारी पर्यंत  पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था, नळजोडणी व रस्त्यांची निर्मिती, रस्त्याचे खडीकरण व काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मदत, घरे मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात … Read more

यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला; शेतकरी बांधवांना भरपाई अदा

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. रतन इंडिया पावर प्लांटच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली. अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे … Read more

एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये; यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल मिळवून दिले जाते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यादीतून काही तांत्रिक कारणांस्तव वगळण्यात आलेल्या गरजूंनाही घर कसे मिळवून देता येईल, असा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने करावा. एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आवास योजनेबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या … Read more

साथरोग रोखण्यासाठी तपासणी, उपचाराच्या अद्ययावत यंत्रणा जिल्ह्यात उभारणार – यशोमती ठाकूर

अमरावती – ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात आढळलेले रूग्ण व कोविड साथीच्या नव्याने आढळणा-या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर, साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात अधिक जलद व अधिक अचूक तपासणीच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी अद्ययावत यंत्रणा आरोग्य विभाग, प्रयोगशाळांकडे उपलब्ध असण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत. नागरिकांची सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, तपासणी व उपचार यंत्रणेसाठी निधीची कमतरता पडू देणार … Read more

संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा – यशोमती ठाकूर

अमरावती – राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्ण, मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे 9 कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण … Read more

बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता – यशोमती ठाकूर

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी काढले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी … Read more

मुलांच्या कौशल्य विकासासाठी यापुढे मोठ्या स्वरूपात उपक्रम – यशोमती ठाकूर

अमरावती – निरीक्षणगृह व बालगृहातील मुलींनी प्रशिक्षण घेऊन कल्पकता व मेहनतीच्या बळावर सुंदर कलात्मक वस्तू तयार केल्या. या मुलांच्या कौशल्यांचा विकास घडवणे, मानसिक बळ व सकारात्मकता वाढविणे यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर हाती घेतला. ही प्रायोगिक तत्वावरील तथापि, महत्वपूर्ण सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल व यादृष्टीने राज्यस्तरावर धोरणही आखण्यात येईल … Read more

‘या’ गावातील आपद्गग्रस्तांना यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

अमरावती – नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात … Read more

गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा – नितीन गडकरी

अमरावती – येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात कमी दरात उपचार उपलब्ध असतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. श्री … Read more