‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी

नागपूर – ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे … Read more

राज्यात ‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा – यशोमती ठाकूर

मुंबई – कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ हे मिशन आम्ही हाती घेतले आहे.‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात मिशन मोडवर राबविण्याचे  निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले. मिशन वात्सल्यबाबत … Read more

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित 970 योजनांना मंजुरी

सोलापूर – जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे 970 योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन … Read more

कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व … Read more

युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होते. उच्च व … Read more

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी … Read more

‘हनी मिशन’ योजनेतून स्वयंरोजगाराची संधी

अमरावती – जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ग्रामीण भागात पूरक रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. याचअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील योगिता इंगळे या युवतीने ‘गॉर्जेस रॉ हनी’  या नावाने मधाचा ब्रँड विकसित केला असून, त्यातून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून या युवतीची निवड करण्यात आली … Read more

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ – गुलाबराव पाटील

जळगाव – कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे राहील. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. … Read more