राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई

पुणे – राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि  प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन … Read more

यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला; शेतकरी बांधवांना भरपाई अदा

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. रतन इंडिया पावर प्लांटच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली. अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे … Read more

दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी  दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलण्याची दादाजी भुसे यांनी केली मागणी

मुंबई – राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह … Read more

तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना मिळणार पशुधनाची नुकसान भरपाई

पूरग्रस्त भागातील विमा उतरविलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे दिली. पत्रकात म्हटले आहे, दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार … Read more