कारले लागवड व वाण, माहित करून घ्या

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगामकरिता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात विकली जातात. त्यासाठी कोणकोणत्या जातीचे कारले लागवड केली जाते … Read more

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा. जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल. हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या … Read more

सुर्यफुल लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन – सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत  – जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे. पेरणी हंगाम – खरीप – जुलै पहिला … Read more

उडीद लागवड पद्धत, माहित करून घ्या

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन –  मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी … Read more

माहित करून घ्या हळद लागवडीची माहिती

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि … Read more

पीक विमा भरण्याकरीता मुदत वाढ द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

सोनई – शेतकरी बांधवांना पिकाच्या होणाऱ्या नुकसनी पासुन वाचवण्यासाठी केंद्र सरकार मार्फत चालविण्यात येणारी पीक विमा योजना अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्या मार्फत अनेक शेतकऱ्यांच्या पीकाची नुकसान भरपाई मिळत असते. यंदाच्या वर्षी कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव व्यवस्थीत मिळालेला नाही त्याच सर्व गोष्टितुन सावरुन शेतकऱ्यांने नवीन हंगामात नवीन आशेने पेरणी केली आहे. त्या पासुन … Read more

‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान

‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या शेतीतील शेतकरी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून तालुक्यातील १५० शेतकरी ही शेती करत आहेत. खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे उत्पन्न घेतात, तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच … Read more