आवास योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा; गरजूंना घरे उपलब्ध व्हावी – सतेज पाटील

अमरावती – पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध व्हावीत. तसेच यासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत,  असे सुस्पष्ट आदेश गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी  दिले. भारतनेट, म्हाडा, प्रादेशिक परिवहन एस. टी., तसेच आवास योजना यासंबंधी गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत – छगन भुजबळ

नाशिक –  ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज येवला विश्रामगृह येथे निफाड व  येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे … Read more

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी कामांना गती द्यावी – गुलाबराव पाटील

मुंबई – जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध  ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याकामी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांकडून कामे गतिमान होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या (पीएमसी) कामकाजासंदर्भात … Read more

प्रशासनाने प्राप्त निधीनुसार नियोजित कामे पूर्ण करावी – यशोमती ठाकूर

अमरावती – सर्व क्षेत्रे व घटकांच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकासकामे राबविण्यात येतील. प्रत्येक तालुक्याला चांगला निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्राप्त निधीनुसार नियोजित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी … Read more

राज्यातील महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार

मुंबई – राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे.  भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more

भुसंपादन होऊन प्रकल्प पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा –  जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्यातील विकास कामांचे, निधी वितरणाचे नियोजन करीत असते. या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासठी निधीची तरतूद करण्यात येते. सदस्य आपआपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत प्रयत्न करीत असतात. मागील दोन वर्षापासून आपण कोविड संसर्गाच्या संक्रमणातून मार्गक्रमण करीत आहोत. अशा परिस्थितीत 30 टक्के निधी कोविड उपाय योजनांसाठी … Read more