दोन कोरोना लाटेतील सहकार्याप्रमाणे जनतेने प्रशासनाला मदत करावी – नितीन राऊत

नागपूर – राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे हळूहळू नागपूर महानगर व जिल्हा कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेकडे अग्रेसर होत आहे. आपल्याकडे बेड, ऑक्सिजन, औषधी, वैद्यकीय मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध आहे. अधिक रुग्ण वाढणार नाही, याची काळजी घेणे सर्वस्वी नागरिकांच्या स्वयंशिस्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे दोन डोस घेतल्याची खातरजमा करा; गरज नसताना गर्दी करू नका, यापूर्वी दोन लाटेत केलेल्या सहकार्याप्रमाणे प्रशासनाला … Read more

कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – जयंत पाटील

सांगली – कोरोनाचे (Corona) संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड द्यावे लागेल, त्याला पर्याय नाही. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय आजच जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी … Read more

अत्याधुनिक सेवा सुविधांच्या उपलब्धीसह लोकाभिमूख गतीमान प्रशासनावर भर – अशोक चव्हाण

नांदेड – प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड … Read more

लसीकरणासाठी कठोर उपायांऐवजी जनतेच्या पुढाकारासह प्रशासनाला घरोघरी जाण्याचे आवाहन – छगन भुजबळ

नाशिक – गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास … Read more

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळमुक्त अन्न पदार्थांसाठी प्रशासनाने कडक कार्यवाही करावी – राजेंद्र शिंगणे

मुंबई – सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. … Read more

प्रशासनाने प्राप्त निधीनुसार नियोजित कामे पूर्ण करावी – यशोमती ठाकूर

अमरावती – सर्व क्षेत्रे व घटकांच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकासकामे राबविण्यात येतील. प्रत्येक तालुक्याला चांगला निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्राप्त निधीनुसार नियोजित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी … Read more

चूक मात्र प्रशासनाची, पण सर्व खापर प्रशासन शेतकऱ्यांवर फोडतय; शेतकऱ्यांकडून परत घेतला जाणार निधी

सोलापूर – अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे … Read more