महिला व बालभवनचे काम तातडीने मार्गी लावावे!- यशोमती ठाकूर यांचे निर्देश

धुळे – महिला व बालकांशी निगडित राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने निधी जमा करण्यात यावा – शंभूराज देसाई

वाशिम –  वाशिम जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना   शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात वाटप करण्यात आला असून तो निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे … Read more

‘या’ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी 140 द.ल.लीटर असून प्रत्यक्षात 120 द.ल.लीटर पाणी … Read more

फळपीक विम्याचा केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना केली मागणी

मुंबई – राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये  148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री … Read more

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या – बच्चू कडू

अकोला – जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीनुसार दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, असे निर्देश  पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा … Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यामध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई – कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक … Read more

उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्या – सुनिल केदार

वर्धा – शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना तातडीने कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे  निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले. कृषि कर्जमाफी योजनेसह पांदन रस्ते, क्रीडा संकुलावर सोलर पॅनल लावणे तसेच बंधा-यांची … Read more

भुसंपादन होऊन प्रकल्प पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा –  जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्यातील विकास कामांचे, निधी वितरणाचे नियोजन करीत असते. या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासठी निधीची तरतूद करण्यात येते. सदस्य आपआपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत प्रयत्न करीत असतात. मागील दोन वर्षापासून आपण कोविड संसर्गाच्या संक्रमणातून मार्गक्रमण करीत आहोत. अशा परिस्थितीत 30 टक्के निधी कोविड उपाय योजनांसाठी … Read more