पोकरा योजना सन २०२१-२२ साठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित; राज्यातील ५ हजार १४२ गावांना होणार लाभ

मुंबई – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) (Pokra) सन २०२१-२२ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि … Read more

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा – कृषिमंत्री

पुणे – बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. ‘स्मार्ट’ (Smart) प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत … Read more

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल – गृहमंत्री

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा (Spinning mill) जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. तापी सहकारी सूतगिरणीच्या (Spinning mill)  धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व … Read more

मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जयंत पाटील

मुंबई – मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले. मुळा प्रकल्पांतर्गत विविध प्रकारच्या कामांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन

पुणे  – कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा, घोड शाखा कालवा व पिंपळगाव जोगे कालव्यात तर मिना शाखा कालव्यात २० डिसेंबरपासून  पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सिंचनभवन येथे झालेल्या बैठकीला  आमदार अशोक … Read more

‘या’ भागातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी – जयंत पाटील यांचे निर्देश

मुंबई – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, आंबेगाव … Read more

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई – मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर, 101 ते 250 हेक्टर आणि 251 … Read more

जून २०२२ पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण करावी – यशोमती ठाकूर

अमरावती – येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत … Read more

जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा – जयंत पाटील

सिंधुदुर्गनगरी – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपवनसंरक्षक श्री. नारनवरे, … Read more

राज्यातील ‘या’ नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी; २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

नवी दिल्ली – नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन  प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व  वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागनदी  पुनरुज्जीवन  प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन … Read more