‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ

नाशिक – ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्ष्टिपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे  प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळेत पालकमंत्री श्री. छगन भुजबळ (Chhagan … Read more

विकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा – नितीन राऊत

नागपूर – डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्प प्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशा वेळी योग्य नियोजन करून विकास (Development) कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी  केले. जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे  पार पडली. या … Read more

कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम प्रशंसनीय – बाळासाहेब पाटील

सातारा – कोरोना काळात आपल्या सर्वांना  एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले. सातारा जिल्हा परिषद, … Read more

तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करा – उदय सामंत

 पुणे – उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची (Technology) किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने (Technology) सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्रायार्य … Read more

सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – अनिल परब

मुंबई – विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) … Read more

प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. येथील फडकुले … Read more

प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा – छगन भुजबळ

नाशिक – येवला शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येवला संपर्क कार्यालय येथे येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची … Read more

लोकहिताची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत – एकनाथ शिंदे

नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहराचा आलेख दरवर्षी उंचावत असून जनतेच्या दृष्टीकोनातून पाहताना पुर्णा शहरात लोकहिताची कामे होत असतांना कामे गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण व्हावी, अशी अपेक्षाही राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम  ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पुर्णा शहरात नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी खासदार … Read more

विकास कामांसाठी नगर परिषदेला भरघोस निधी उपलब्ध करुन देणार – एकनाथ शिंदे

परभणी – नागरीस्तरावर काम असताना लोकाभिमुख निर्णय घेण्याची संधी मिळत असते. त्याच संधीला सुवर्णसंधी बनवुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. निधी अभावी लोकविकासाची कामे अडणार नाहीत  याची दक्षता घेत असतांनाच चांगले व गुणवत्तापुर्ण काम करण्यासाठी पुर्णा नगर परिषदेला निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील विविध विकास कामांसाठीचे प्रस्ताव सादर करताच प्राधान्याने  नगर परिषदेला भरघोस निधी … Read more

गृहभेटीतून लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा – छगन भुजबळ

नाशिक – सण, उत्सवाच्या काळानंतरही रूग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, परंतु धोका पूर्णत: टळलेला नाही. या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे काम गृहभेटी देऊन वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणा व उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत. येवला संपर्क … Read more