नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत. तर यावर आता काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या, शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले, शेतकऱ्यांचा सत्याग्रह ७०० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर हा भाजपा सरकारचा अहंकार आणि अन्नदात्यांवर केलेले अत्याचार म्हणून हे वर्ष ओळखले जाईल.
किसान आंदोलन का एक साल
किसानों के अडिग सत्याग्रह, 700 किसानों की शहादत और निर्मम भाजपा सरकार के अहंकार व अन्नदाताओं पर अत्याचार के लिए जाना जाएगा।
लेकिन भारत में किसान की जय-जयकार हमेशा थी, है और रहेगी।
किसानों के संघर्ष की जीत इसका प्रमाण है।जय किसान। pic.twitter.com/KCWnLNog0B
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 26, 2021
भारतीय शेतकऱ्यांचा जयजयकार नेहमी होत आलेला आहे. आणि तो होत राहील. शेतकऱ्यांच्या संघर्षाला आलेले यश हे याचे प्रमाण आहे, जय किसान. असे ट्विट प्रियंका गांधींनी केले आहे. राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदे रद्दबातल होत नाहीत, तोपर्यंत घरवापसी नाही’ असा नारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले असल्याची माहिती १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिली. मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफी देखील मागितली आहे.
- भारतातील ‘या’ भागांमध्ये आजपासून पुढचे २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
- ‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या
- पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून
- भारतीय संविधान जगाला आदर्श; देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकद संविधानात
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर
- फळबागेव्यतिरिक्त इतर पिकेही ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्न करणार – कृषिमंत्री