प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त!

मुंबई – प्रधानमंत्री (Prime Minister) सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ … Read more

राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण – छगन भुजबळ

मुंबई – ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित तांदुळाच्या वितरणाचे … Read more

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, अन्नदात्यांवर केलेले अत्याचार म्हणून हे वर्ष ओळखल जाईल – प्रियंका गांधी

नवी दिल्ली –  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या … Read more

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, … Read more

अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – राजेंद्र शिंगणे

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे … Read more

अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहाेचावे – छगन भुजबळ

बीड –  अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा दौऱ्यावर … Read more

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळमुक्त अन्न पदार्थांसाठी प्रशासनाने कडक कार्यवाही करावी – राजेंद्र शिंगणे

मुंबई – सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. … Read more

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करणार – दादाजी भुसे

मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना … Read more

अन्न खराब न होऊ देता ते दीर्घकाळ कसे टिकवावे, जाणून घ्या

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते. अन्नपदार्थ खराब होण्याची कारणे अनेक असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी व तो किती काळ सुरक्षितपणे साठवावयाचा आहे, यानुसार परिरक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. सुमारे 10,000 … Read more

पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता – (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल? जाणून घ्या

वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते. हि लक्षणे कशी ओळखाल ,हे जाणून घ्या – मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे अन्नद्रव्य लक्षणे नायट्रोजन(N) : जुनी पाने पिवळी पडतात. … Read more