‘या’ जिल्ह्यामध्ये आलेल्या ऊस तोडणी मजुरांचे शेतात जावून लसीकरण

कोल्हापूर –  मराठवाड्यातून हजारो मजुर अनेक ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत.  तर हे हजारो मजूर कोल्हापूर जिल्ह्यात आल्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या  मजुरांनी कोविडची पहिली लसही घेतलेली नाही. त्यामुळे  गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्सकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावातील ऊसाच्या शेतात जावून लसीकरण करण्यात येत आहे.

राज्यातील असा एकमेव जिल्हा म्हणजे कोल्हापूर इथे ऊस तोडणीसाठी हजारो  येतात. तर या मजुरांचे लहान  मुले, कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिकही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ४ महिने राहतात. तर यामुळे या मजुरांना शेतात जाऊन कोविडची पहिली लसही देण्यात येत आहे.

हे हजारो मजूर ऊस तोडणीसाठी गावागावात जातात तर हे हजारो मजूर स्थानिकांच्या संपर्कात येतात. तर यामध्ये  शेतकरी, विक्रेत्यांचा मोठा समावेश असतो. त्यामुळे आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी प्राजक्ता जाधव यांनी आपल्या पथकांना कामगारांच्या लसीकरणासाठी गावागावात पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या –