पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड, व्हिडीओ व्हायरल; सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल!

पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड (Egg planting) करण्यात आल्याचे एक व्हिडीओ दाखवण्यात आले आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हे ऐकायला खूप विचित्र वाटत असले तरी व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची अनेक अंडी दिसत आहेत. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की अंड्याची लागवड (Egg planting)  करता येते. … Read more

‘या’ जिल्ह्यामध्ये आलेल्या ऊस तोडणी मजुरांचे शेतात जावून लसीकरण

कोल्हापूर –  मराठवाड्यातून हजारो मजुर अनेक ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत.  तर हे हजारो मजूर कोल्हापूर जिल्ह्यात आल्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या  मजुरांनी कोविडची पहिली लसही घेतलेली नाही. त्यामुळे  गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्सकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावातील ऊसाच्या शेतात जावून लसीकरण करण्यात येत आहे. राज्यातील असा एकमेव … Read more

मोठा निर्णय : राज्यात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविणार

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ … Read more

जिल्ह्यातील शेतमजुरांना प्रकल्पग्रस्त घोषित करा – नितीन राऊत

नागपूर – नागपूर जिल्ह्यात पेंच, कर्हांडला, मोगरकसा सारखे पर्यटन स्थळांकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापक धोरण तयार करावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, … Read more

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी

जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो.  ज्या गावातील जमींन खारेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व “आठ अ” तपासून पाहावा. ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या शासनाने … Read more

जाणून घ्या , काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more