देशात गेल्या २४ तासात 10 हजार 967 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट पाहायला मिळाली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 इतकी झाली आहे.

देशातील सध्या एक लाख 7 हजार 19  रुग्णांवर उपचार सुरु आहे.  तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनाचे 10 हजार 549 नवे रुग्ण आढळले होते. शनिवारी या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 4 लाख 67 हजार 933 लोकांचा मृत्यू झालाय.  देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी 98.34% इतका झालाय.

महत्वाच्या बातम्या –