महाराष्ट्रात ३ लाख ३० हजार कोटींचे औद्योगिक करार – सुभाष देसाई

नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्यात  मागील दोन वर्षात ३ लाख ३० हजार कोटींचे औद्योगिक करार झाले असून गुंतवणूकदांरानी राज्याला प्रथम पसंती दर्शविली असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी दिली. 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री … Read more

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते . व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. … Read more

बांधकाम कामगारांना ७ कोटी ३४ लाख कोटींच्या निधीचे वाटप

मुंबई – इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांची आढावा बैठक घेतली, तेव्हा सदर … Read more

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार; राज्यात २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात … Read more

कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक – कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार,डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस … Read more

चांगली बातमी – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार

नाशिक – केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना उद्योग उभारणी, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रँडिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधनासाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के किंवा कमाल १० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे … Read more

मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला – अनिल परब

मुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून, लवकरच त्यांना सप्टेबर … Read more

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – विजय वडेट्टीवार

मुंबई – राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरी, सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधितांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व … Read more

दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर

नवी-दिल्ली – अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत लवकरात-लवकर बाधीतांपर्यंत पोहोचेल याची … Read more