प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त!

मुंबई – प्रधानमंत्री (Prime Minister) सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ … Read more

उद्योग व स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याद्वारे गरजू घटकांना सक्षम बनवावे – धनंजय मुंडे

मुंबई – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व महाप्रित कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यासाठी चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ गरजू घटकांना मिळावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. महात्मा फुले मागासवर्ग … Read more

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ची निर्मिती करा – सुभाष देसाई

औरंगाबाद – प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून होण्यास मदत होते.  त्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना … Read more

राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा – अमित देशमुख

पुणे – राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे राज्य शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. … Read more

हाडे मजबुत करण्यासाठी मशरुम आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी … Read more

लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – वाढत्या औद्योगिक प्रदुषणामुळे चंद्रपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील झाडे काळसर पडली आहेत. जगाच्या पाठीवर कदाचित हे एकमेव उदाहरण असेल जेथे झाडांचा रंग हिरव्यासोबतच काळा बघायला मिळतो. तसेच प्रदुषणाच्या समस्येची तिव्रता लक्षात येण्यासाठी शहरात लावण्यात आलेले कृत्रिम हृदयसुध्दा चार-पाच दिवसातच काळे होते. यावरून चंद्रपूरची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कंपन्या … Read more

उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – नवाब मलिक

पुणे – राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेत काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. औंध येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या नवीन लॅबचे … Read more

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – सुभाष देसाई

मुंबई – देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही वातावरणामुळे अनेक गुंतवणुकदार पुढे येत आहेत. देशातील सर्वाधिक परदेशी गुंतवणुक ही आपल्या राज्यात होते. त्यामुळे राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय … Read more

जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापूस, धान, वनउपज आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच नागरिकांचे आयुष्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य होईल, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार … Read more

सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार – हसन मुश्रीफ

मुंबई – कामगारांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना किमान वेतन असावे यासाठी समिती गठित करून यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देशही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी  दिले. मंत्रालयात कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान … Read more